Breaking News

विविध क्षेत्रात शिक्षकांची मुले आघाडीवर -शालिनीताई विखे माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने

अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षक विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य तळमळीने करत असून, आज विविध क्षेत्रात शिक्षकांची मुले आघाडीवर आहे. सर्वसामान्य घटकातील मुलांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी शिक्षकांनी जाणीवपुर्वक प्रयत्न करण्याची गरज असल्याची भावना जि.प. अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी व्यक्त केली.


अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने आयोजित सभासदांच्या गुणवंत पाल्यांच्या गौरव सोहळ्यात नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील कुस्तीपटू पै.संदिप डोंगरे, प्रतिभा डोंगरे व प्रियंका डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विखे बोलत होत्या.

 याप्रसंगी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सहसचिव दीपलक्ष्मी म्हसे, सोसायटीचे माजी संचालक सुभाष कडलग, जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे राजेंद्र लांडे, सोसायटीचे ज्येष्ठ संचालक प्रा.भाऊसाहेब कचरे, चेअरमन किशोर जाधव, व्हा.चेअरमन सुरेश मिसाळ, सचिव सोन्याबापू सोनवणे, संचालक सुनिल काकडे, आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, उत्तम खुळे, अंबादास राजळे, हुसेन सय्यद, कल्याण ठोंबरे, केशव गुंजाळ आदि उपस्थित होते.
पै.संदिप डोंगरे याने राज्यस्तरीय ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. प्रतिभा व प्रियंकाने आळंदी (जि.पुणे) येथे झालेल्या राज्यस्तरीय वरिष्ठ महिला अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तसेच प्रियंकाला शासनाचा जिल्हा आदर्श युवती पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. 

संदिप, प्रतिभा व प्रियंका हे नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे यांचे मुले आहेत. हे तीनही खेळाडू न्यु आर्टस, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयाचे विद्यार्थी असून, क्रीडा क्षेत्राबरोबर श्री नवनाथ युवा मंडळाच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक कार्य चालू आहे. संदिप या संस्थेचा अध्यक्ष असून, प्रतिभा सचिव तर प्रियंका संचालक मंडळावर आहे. या संस्थेच्या वतीने नगर तालुक्यात स्वच्छता अभियान, स्त्री सक्षमीकरण, मुलगी वाचवा... मुलगी शिकवा, स्त्री जन्माचे स्वागत, वृक्षरोपण आदि विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहे.