व्यंकटेश पतसंस्थेसमोर ठेवीदारांचे आंदोलन
सोनई/प्रतिनिधी/- नेवासा तालुक्यातील अग्रगण्य समजली जाणारी व सर्वसामान्याच्या विश्वासाला पात्र ठरणाऱ्या पतसंस्थेत ठेवीदारांचे पैसे मुदतीनंतर ठेवीदाराला पैसे न मिळाल्याने श्री.व्यंकटेश नागरी पतसंस्थेच्या कार्यालयात ठेवीदारांनी ठिय्या आंदोलन करण्यात केले.
यावेळी ठिय्या आंदोलनात 100 हुन अधिक ठेवीदार सभासद सामील झाले होते. नोटा बंदी नंतर पतसंस्था अडचणीत आल्याचे सांगितले जाते. ठेवींच्या प्रमाणात कर्जाचे वाटप जास्त व थकबाकी वसुली वेळेत न आल्याने पतसंस्था आर्थिक अडचणीत आल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुनील बंग व उपाध्यक्ष अभय चंगेडिया यांनी ठेवीदाराना सांगितले.
गेल्या एक वर्षापासून सर्व सामान्य ठेवीदारांना पावत्यांची मुदत संपूनही वारंवार चकरा माराव्या लागत आहे. येत्या महिन्यात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ठेवीदारांचे पैसे अदा नाही केले, तर कार्यालयासोबतच पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संतप्त झालेल्या नागरिकांनी व्यक्त केला.
ठेवीदारांचे पैसे परत मिळत नसल्याने परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यात कोणाच्या घरी लग्न समारंभ, घराचे बांधकाम,आजारपण, मुलांचे शिक्षण इ.साठी ठेव ठेवलेला पैसा वेळेत न येत असल्याने उपस्थित ठेवीदार संतप्त होऊन पदाधिकाऱ्यांच्या दुकानात जाऊन महिला व पुरुषांनी पैशाची मागणी केली. त्यावेळी शाब्दिक चकमक होऊन वाद वाढीस लागला . ठेवीदारांच्या पावतीवर तत्कालीन कर्मचाऱ्यांनी परस्पर कर्ज काढून व बनावट कागदपत्र तयार करून ठेवीदारांच्या नावे टाकल्याचे आरोप करताच संबंधित कर्मचाऱ्यांना बोलावून सोक्ष-मोक्ष करण्याची मागणी ठेवीदारांनी यावेळी केली.

Post Comment