बालाजी देडगाव ग्रामपंचायत साठी होणार तिरंगी लढत ?
प्रतिनिधी/- नेवासा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय प्रतिष्ठेची असलेल्या बालाजी देडगाव ग्रामपंचायात निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. येथे २६ डिसेंबरला मतदान होत आहे. येथील सरपंचपद सर्वसाधारण स्री- राखीव असल्याने व प्रथमच सरपंचपद जनतेतून असल्याने सरपंचपदासाठी अनेक उमेदवार रिंगणात उतरणार असून यामुळे सरपंचपदासाठी बहुरंगी तर सदस्यपदासाठी तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र सदस्यपदासाठी उमेदवार मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच बघण्यास मिळत आहे.
बालाजी देडगाव ग्रामपंचायतच्या ५ प्रभागातून १५ उमेदवार निवडून येणार आहेत. यासाठी ४४०० मतदार मतदानाचा हक्क बजवणार आहेत. गत निवडणुकीत १३ जागेपैकी १० जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या तर ३ जागेसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी गटाने विजय मिळवला होता. यावेळेस मात्र सरपंच पद जनतेतून असल्याने प्रत्येक जागेसाठी जोरदार रस्सीखेच निर्माण झाली आहे.
या ठिकाणी सरपंच पदासाठी बहुरंगी लढत होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गट स्थापन करून निवडणूक लढवण्याबरोबरच अनेक अपक्षही सरपंचपदासाठी मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. निवडणुकीसाठी ५ डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात झाली . असून उमेदवाराची कागदपत्रे पूर्तता करताना व निवडणूक आयोगाच्या नवीन नियमाची पूर्तता करताना चांगलीच धावपळ उडत आहे.
सरपंचपदासाठी व प्रभागातून उमेदवारी करणारे उमेदवार वैयक्तिक भेटीगाठीद्वारे मतदारांशी संपर्क साधून आपली बाजू पटवून देत आहेत. गठ्ठा मतदान असलेल्या प्रभागात आपल्या गटाचा भक्कम उमेदवार देऊन सरपंच पदासाठी मतदान वाढवण्यावर पक्षनेतृत्वाचा भर दिसत आहे.ग्रामपंचायतसाठी सुरु असलेल्या प्रचाराच्या जोरदार रणधुमाळीमुळे एन थंडीत राजकीय वातावरण तापले आहे.

Post Comment