Breaking News

उमेदवाराने एकाच जागेवर निवडणूक लढवावी : निवडणूक आयोगाची सर्वोच्च न्यायालयात माहिती

नवी दिल्ली : उमेदवाराने एकाच वेळी दोन जागांवर निवडणूक लढवू नये, असे स्पष्ट मत निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात नोंदविले. दोन्ही जागांवर निवडून आल्यास उमेदवाराला एका जागेचा राजीनामा द्यावा लागता आणि पोटनिवडणूक घ्यावी लागते. त्यामुळे खर्चाचा बोजा पडतो, असेही आयोगाने स्पष्ट केले.

लोकसभा, विधानसभेसह सर्व स्तरांवरील निवडणुकांमध्ये उमेदवाराला एकाचवेळी दोन जागांवर निवडणूक लढवण्यास मनाई करण्यात यावी, अशी मागणीची याचिका अश्‍विनी उपाध्याय यांनी न्यायालयात दाखल केली होती. ‘एक व्यक्ती- एक मतदान याप्रमाणे एक उमेदवार एक जागा असे सूत्र लागू करण्यात यावे, असे याचिकेत म्हटले होते. एका उमेदवाराने एकाच जागेवर निवडणूक लढवावी. 

दोन्ही जागांवर विजय मिळाल्यास एका जागेचा राजीनामा द्यावा लागतो आणि पोटनिवडणूक घ्यावी लागते. त्यामुळे सरकारी तिजोरीवर अतिरिक्त खर्चाचा भार पडते. त्यामुळे एका उमेदवाराला दोन्ही जागांवर निवडणूक लढवण्याची परवानगी देणारी लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतूद असंवैधानिक घोषित करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली होती.