Breaking News

शरद पवार भावी राष्ट्रपती : सुशीलकुमार शिंदे


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे भावी राष्ट्रपती आहेत, असे वक्तव्य काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. सुशीलकुमार शिंदे पवारांकडे बघत म्हणाले, एका माजी राष्ट्रपतीचा सन्मान भावी राष्ट्रपतीकडून होत आहे. मात्र यानंतर लगेचच पवारांनी हात हालवत नाही अशी खुण केली. त्यावर सुशीलकुमार शिंदे यांनी चुटकी घेत, पवार जेव्हा नाही म्हणतात तेव्हा ते होय असे समजायचे असते हे मला त्यांच्यासोबत इतकी वर्ष राहिल्यानंतर समजले असे शिंदे म्हणताच, सभागृहात एकच हशा पिकला.