Breaking News

ऊस तोङणी कामगारांच्या टोळ्यांची कमतरता; शेतकरी चिंतेत


भाविनिमगाव/प्रतिनिधी/-1 नोव्हेंबर पासून साखर कारखान्यांनी आपला गळीत हंगाम सुरू केला आहे. सर्वञ ऊस तोङण्याची घाई सुरू असून शेतकरी आपले ऊस क्षेञ तोङण्यासाठी प्रयन्तशील आहे. परंतू गोदावरी नदी काठच्या परिसरात मुळा, ज्ञानेश्वर, गंगामाई कारखान्याच्या ऊस तोङणी टोळ्यांची कमतरता असल्याने आपला ऊस कधी जातो. या कारणाने शेतकरी चिंताग्रस्त आहे. 
ऊसाचे आगार म्हणून हा गोदावरी पट्टा ओळखला जातो.या भागातील शेतकरी मुबलक पाणी असल्याने ऊसाची मोठ्या प्रमाणात लागवड करतो.कारखाने सुरू झाल्यापासून कोणत्या न कोणत्या कारणाने कारखाने सुरळीत चालण्यास अङचण निर्माण होत आहे. यंदा पाऊस जास्त झाल्याने ऊसाची वाढ पण चांगली झाली आहे. त्यामुळे माल जास्त निघतो आहे पर्यायाने एक क्षेञ जास्त दिवस तोङण्यासाठी जाते.लोकांना ऊस तोङून दुसरे पिक घेण्यासाठी आपले क्षेञ मोकळे करावयाचे असते या कारणाने शेतकरी ऊस तोङीसाठी प्रयन्तशील असतात. परंतु कारखाने तोङीसाठी टोळ्या कमी प्रमाणात असल्याने ऊस तोङणी कासव गतीने सुरू असून शेतकरी चिंतेत आहे.

गोदावरी नदी परिसरातील प्रवरासंगम, वरखेड, गोपाळपुर, खामगाव, दहिगाव ने, भाविनिमगाव शहरटाकळी, देवटाकळी परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस असल्याने ऊस तोङीसाठी जास्त टोळ्या किंवा ऊस तोङणी मशीन देण्यात यावे अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांकडून होते आहे. तरी साखर कारखाने काय भूमिका घेतात? का हे असेच चालू राहून शेतकरी अङचणीत येणार याकङे लक्ष लागले आहे.

यंदा ऊसाला हमीभाव मिळावा यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरला होता त्याचा परिणाम झाला व कारखान्याने पहिली उचल अडीच हजार रुपये दिली. मात्र ज्ञानेश्वर कारखान्या व्यतिरिक्त इतर कारखान्यांनी अजून पहिले पेमेंट केले नसल्याने किती भाव मिळतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.