Breaking News

बेघर विस्थापित महिलांना मिळणार मोफत घर!

लातूर येथील बेघर, गरजू विस्थापित अशा ८७ महिला कुटुंबांना घरासाठी जागा उपलब्ध व्हावी, म्हणून मंत्रालय व विधिमंडळ स्तरावर वेगवेगळ्या आयुधांमार्फत 'समर्थन' संस्थेने सन २०१५ पासून चालवलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले. 


८७ बेघर गरजू विस्थापित महिलांना एकही रुपया खर्च न करता मोफत हक्काचे घर मिळणार आहे. तशी मान्यता राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळात दिली.विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार विद्या चव्हाण, किरण पावसकर, नरेंद्र पाटील यांच्यामार्फत 'समर्थन' या संस्थेने विधिमंडळात तारांकित प्रश्न दाखल केला होता. त्या प्रश्नाला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक उत्तर दिले असून, या ८७ महिला लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी ४५ पात्र लाभार्थ्यांची नावेदेखील समाविष्ट करण्यात आली आहेत.