Breaking News

लोकनेते स्व.माजी आमदार राजीव राजळे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी .


पाथर्डी (प्रतिनिधी).पाथर्डी येथे उद्धघाटन होणाऱ्या जॉगिंग पार्कमध्ये लोकनेते स्व.माजी आमदार राजीव राजळे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा. अशा मागणीचे निवेदन भाजप युवा मोर्चाचे शहर सरचिटणीस सागर दत्तात्रय पाथरकर यांच्या वतीने मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,१२ डिसेंबर रोजी स्व.लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त पाथर्डी नगरपरिषदेच्या वतीने जॉगिंग पार्कच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.त्या जॉगिंग पार्कमध्ये स्व.मा.आमदार राजीव राजळे यांचा पूर्णकृती पुतळा बसविण्यात यावा.हा ट्रॅक निर्माण व्हावा यासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे.त्याचे तालुक्यातील आणि शहरातील काम पाहता ते भावीपिढीसाठी प्रेरणादायी आहेत.म्हणून हा पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.