Breaking News

अंगणवाड्यांच्या दर्जा सुधारण्यासाठी लोक सहभागातून प्रयत्न आवश्यक- सभापती गडाख


नेवासा/प्रतिनिधी/-डिजिटल अंगणवाड्यासाठी लोक सहभाग हा महत्वाचा घटकअसून अंगणवाडयांचा दर्जा सुधारण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नेवासा पंचायत समितीच्या सभापती सुनिता गडाख यांनी केले.
तालुक्यातील खुपटी येथील संयुक्त असलेल्या अंगणवाडी क्रमांक २३२/२३३ ला नेवासा पंचायत समितीच्या सभापती सुनिता गडाख यांनी भेट दिली.यावेळी सभापती.गडाख यांनी दिलेल्या भेटीप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य तुकाराम शेंडे,पंचायत समितीचे सदस्य विक्रम चौधरी,सरपंच राजश्री तनपुरे, गोरक्षनाथ तनपुरे हे उपस्थित होते. यावेळी अंगणवाडी सेविका श्रीमती शमाभाभी शेख यांनी स्वागत करून गडाख यांचा सत्कार केला. ग्रामपंचायतच्या पुढाकारानेअंगणवाडीच्या चिमुकल्या बालकांसाठी खुर्च्या देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगून डिजिटल अंगणवाडी करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सुनीता गडाख यांनी अंगणवाडी मध्ये प्रथमच बालचिमुकल्या मुलांना खुर्च्या पाहून आनंद व्यक्त करत अंगणवाडी डिजिटल झाल्या. तर मुलांचे मन रमू शकेल यासाठी सहभाग घेऊन सर्वांनी अंगणवाडी च्या उत्कर्षासाठी प्रयत्न करावा असे आवाहन करून त्यांनी अंगणवाडीच्या माध्यमातून गुणवत्ता व दर्जा वाढविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली.