Breaking News

तरूणांनो एकतेचे राजकारण करूया - राहूल गांधी.

काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांची तरूणांना भावनिक साद 


नवी दिल्ली : काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहूल गांधी यांनी शनिवारी अध्यक्षपदांची सूत्रे स्वीकारल्यानंतर आपल्या पहिल्याच भाषणात गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजप या देशात हिंसा पसरवण्याचे काम करत आहे, तर आम्ही सर्वांना जोडण्याचे काम करत आहोत, असे सांगत राहूल गांधी यांनी तरूणाईला भावनिक साद घालत, तरूणांनो आपण एकतेचे आणि प्रेमाचे राजकारण करूया अशी भावनिक साद घातली.


भविष्यातील त्यांच्या वाटचालीची झलकच यातून पाहायला मिळाली. सोनिया गांधी यांच्या भाषणाच्या अगोदर उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी सुरु केली. राहुल गांधी भाषणाला उभे राहिल्यावर फटाक्यांचा आवाज येतच होता. त्याकडे लक्ष वेधत राहुल गांधी म्हणाले, एकदा आग लावली ती ती विझवणे कठीण असते याचे हे उत्तम उदाहरण आहे. मी भाजपच्या लोकांनाही हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. 

भाजप संपूर्ण देशात हिंसेची आग पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. ते आग लावतात, आम्ही विझवतो, ते तोडतात आणि आम्ही जोडतो, ते रागावतात आणि आम्ही प्रेम करतो, असे सांगत त्यांनी भाजप आणि काँग्रेसच्या विचारधारेतील फरक नमूद केला. त्यांना रोखण्याची क्षमता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्येच आहे, असेही त्यांनी सांगितले. नवी दिल्लीत काँग्रेसच्या मुख्यालयात राहुल गांधीच्या पदभार अघिग्रहनाचा सोहळा रंगला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह पक्षाचे सर्व दिग्गज नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते.