Breaking News

व्यसनी मुलाचा वडीलांवर तलवारीने हल्ला


लातूर, दि. 20, डिसेंबर - शेतीच्या वाटणीवरुन एका मुलाने आपल्या वडीलांवर तलवारीने वार करुन त्यांना जीवंत जाळल्याची घटना लातूर तालुक्यातील उदगीर जिल्ह्यात घडली आहे. केरबा वंगवाड असे त्या शेतकर्‍याचे नाव आहे.केरबा वंगवाड यांची चांदगाव शिवारात 35 एकर शेती असून त्यांचा मुलगा गोविंद हा व्यसनाधीन होता. आरोपी गोविंदचे शेतीच्या वाटणीवरुन वाद होऊन त्याने नशेमध्ये हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. गोविंदने वेळ अमावस्येसाठी उभारलेल्या शेतातील खोप, आजूबाजूला शेतात पडलेल्या तुराट्या एकत्र करुन आपल्या जन्मदात्याला शेतातच जाळले.