Breaking News

जुगार अड्ड्यावर छापा, 6 जण ताब्यात; 46 हजारांची रोकड जप्त


सोलापूर, दि. 20, डिसेंबर - सदर बझार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे स्टेशनसमोरील काङादी चाळीतील जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्यांकडून पोलिसांनी 46 हजारांची रोकड जप्त केली आहे. अटक करण्यात आलेल्यांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.