Breaking News

मोरवाडी येथे अडीच लाखांची घरफोडी

पुणे, दि. 12, डिसेंबर - बंद फ्लॅटचे कुलुप तोडून चोरट्यांनी घरातील सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल पळवला आहे. ही घटना मोरवाडी येथील लक्ष्मण रेसीडेन्सी येथे घडली. या प्रकरणी अविनाश सावंत (वय 53 रा. मोरवाडी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सावंत कुटुंबीय बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला व कपाटातील रोख रक्कम 30 हजार रुपये, सोन्या चांदीचे दागिने असा एकूण दोन लाख 35 हजार 855 रुपयांचा ऐवज चोरीला गेला. चोरट्यांनी सावंत यांचे शेजारी राहत असलेल्या रामप्रसाद गुप्ता यांच्या घराचा दरवाजाही कुलुप तोडून उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांना यामध्ये यश आले नाही.पिंपरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक जी.एन. कडाळे याचा पुढील तपास करत आहेत.