नागपुरात टोळीयुद्धात दोन गुंडांची हत्या
नागपूर : नागपुरात पुन्हा एकदा टोळीयुद्धाचा भडका उडाला असून आज, मंगळवारी पहाटे गुंडांच्या एका टोळीने प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांना कारने उडवले. या अपघातानंतरही ते गुंड जिवंत असल्याचे समजताच कारमधून आलेल्या पहिल्या टोळीने जखमी असलेल्या तिघांवर लोखंडी रॉडने हल्ला चढवला.
यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर तिसरा गुंड मृत्यूशी झुंझतो आहे. ही घटना पहाटे साडेचार वाजता नंदनवन परिसरात घडली. संजय बनोदे उर्फ भु-या (वय 40, रा. पांढराबोडी), बादल संजय शंभरकर (वय 26, रा. कुंजीपेठ) अशी मृतांची नावे आहेत. तर, राजेश हनुमंत यादव (वय 45, रा. बाजारगाव) असे गंभीर जखमीचे नाव आहे.