Breaking News

5 वर्षांत अडीचशे मुलांवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया

बीड /दि. 20, डिसेंबर - राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत गेल्या पाच वर्षांमध्ये अडीचशे मुलांवर हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तर अपेंडिक्स, ह र्निया, किडनीसह इतर 2006 शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्या. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडी, शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती.


विद्यार्थ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी 2008 साली महाराष्ट्र शासनाने शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार 2013 साली याचे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम असे नामांतर झाले. या कार्यक्रमाअंतर्गत वर्षातून दोन वेळा अंगणवाडीची, तर एक वेळेस शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते.