Breaking News

वर्षभरात भारतात दीड कोटी महिलांचा गर्भपात !

२०१५ मध्ये भारतात जवळपास १ कोटी ५६ लाख महिलांचा गर्भपात झाल्याचे 'द लान्सेट ग्लोबल हेल्थ'मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात म्हटले आहे. १५ ते ४९ वर्षे वयोगटातील दर एक हजार महिलांमागे गर्भपाताचा दर ४७ टक्के राहिल्याचे यात म्हटले आहे. 


दक्षिण आशियाई देशातील गर्भपाताच्या दराच्या बरोबरीत भारताचा दर आहे. भारतील महिला गर्भपातासंबंधीच्या आव्हानांचा सामना करीत आहेत. सरकारी आरोग्य केंद्रांत गर्भपाताच्या मर्यादित सुविधांचाही यात समावेश असल्याचे न्यूयॉर्कमधील गुटमेकर संस्थेतील आंतरराष्ट्रीय संशोधनाच्या उपाध्यक्षा डॉ. सुशीला सिंह म्हणाल्या. 

प्रशिक्षित कर्मचारी, योग्य सुविधा तसेच उपकरणांच्या अभावामुळे अनेक सरकारी आरोग्य केंद्रांत गर्भपाताची सुविधा उपलब्ध केली जात नाही. ८१ टक्के गर्भपात हे औषधांच्या माध्यमातून तर १४ टक्के गर्भपात आरोग्य केंद्रात शस्त्रक्रियेच्या माध्यमातून आणि उर्वरीत ५ टक्के गर्भपात इतर असुरक्षित पद्धतींद्वारे झाल्याचे संशोधकांच्या निदर्शनास आले आहे. २०१५ मध्ये चार कोटी ८१ लाख गर्भवती महिलांपैकी जवळपास अध्र्या गर्भधारणा या इच्छा नसताना झाल्याचे या अभ्यासात दिसून आले आहे..