Breaking News

डी.एस.पी. चौक ते बेलेश्‍वर चौक पर्यन्तच्या रस्त्याची दुरुस्ती व रुंदीकरणाचे काम सुरु

अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दादाभाऊ कळमकर व आ.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष संजय सपकाळ यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश येवून, डी.एस.पी. चौक ते बेलेश्‍वर चौक पर्यन्तच्या रस्त्याची दुरुस्ती व रुंदीकरणाचे काम सुरु झाले आहे. या रस्याच्या कामाची पहाणी आ.संग्राम जगताप यांनी केली. 


यावेळी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते दादाभाऊ कळमकर, भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ, माजी महापौर अभिषेक कळमकर, संजय गाडे, अभिजीत सपकाळ, सुभाषचंद्र पाटील, कॅन्टोमेंन्टचे उपाध्यक्ष मुसद्दिक सय्यद, मतीन ठाकरे, विलास निरवणे, सागर चाबुकस्वार, प्रमोद जाधव, समीर शेख आदी उपस्थित होते.

या रस्त्यावरुन शाळा व माहाविद्यालयात जाण्यासाठी विद्यार्थ्यांची वर्दळ असते. पोलिस अधिक्षक कार्यालय व जिल्हा न्यायालयात जाण्यासाठी या रस्त्याचा वापर होत असतो. तसेच मुकुंदनगर, गोविंदपुरा व भिंगार भागातील नागरिकांची या रस्त्यावर रहदारी नेहमी असते. या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने अनेक लहान मोठे अपघात घडत होते. 

यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी राष्ट्रवादीचे भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ यांनी आर्मड कोर सेंटर, कॅन्टोमेंन्ट बोर्ड, एम.ई.एस. चे कार्यकारी अभियंता यांच्याकडे वेळोवेळी निवेदन देऊन केली होती. केंद्रिय संरक्षण विभागाच्या अखत्यारित असलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने या रस्त्याचे काम मार्गी लागून, प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे.