‘थर्टी फस्ट’च्या रात्री लॉन, ढाबे महावितरणच्या रडारवर
नागपूर - येत्या 31 डिसेंबर रोजी मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी नागपूर आणि परिसरातील हॉटेल्स, रिसॉर्ट्स, ढाबे आणि लॉन्स सज्ज आहेत. याठिक ाणी अनेक ठिकाणी मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. या कार्यक्रमात वीजेचा अनधिकृत वापर होऊ नये यासाठी महावितरणने विशेष उपाययोजना केल्या असून हा आनंद साजरा करताना वीजेचा अधिकृत वापर करण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.
नागपूर शहर आणि लगतच्या परिसरात अनेक लॉन, हॉटेल्स, रिसॉर्टस आणि ढाब्यांवर मनोरंजनासोबतच गायन, नृत्य, डीजे, बॉलिवूड नाईट, डिस्को, जॉझ, पॉपइंटरनॅशनल साँग्स, पार्टीज, लाईव्ह बॅण्ड यासारख्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन केल्या जात आहे. अश्या कार्यक्रमांप्रसंगी अनेक ठिकाणी चोरीची वीज वापरल्या जात असल्याची माहिती असून त्यावर निर्बंध घालण्यासाठी महावितरणने अनेक उपाययोजना केल्या आहेत. अश्या कार्यक्रमाप्रसंगी वीजचोरी आढळल्यास वीजचोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासोबतच संबंधित आयोजकाचा परवाना रद्द्बातल करण्यासाठी शासकीय यंत्रणेकडे पाठपुरावाही केला जाणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.