Breaking News

राधेश्याम मोपलवारांना चौकशी समितीची क्लीन चिट !

मुंबई : समृद्धी हायवे जमीन खरेदी घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना चौकशी समितीने क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे मोपलवार पुन्हा सेवेत परतणार आहे. समृद्धी हायवे जमीन खरेदी घोटाळा प्रकरणात राधेश्याम मोपलवार यांची दलालासोबतची एक ऑडिओ क्लिप व्हारयल झाली होती. 


मोपलवार यांच्या ’सेटलमेंट’चा आरोप होतोय. या आरोपानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं होतं. विरोधकांच्या दबाबमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट 2017 मध्ये मापेलवार यांच्यावर एक चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीने आता आपला अहवाल दिलाय. या अहवालात कथित ऑडिओ क्लिपमध्ये छेडछाड करण्यात आलीये असा निष्कर्ष चौकशी समितीने काढला. 

चौकशी समितीने मोपलवार यांना क्लिन चिट दिल्यामुळे मोपलवार यांचा सेवेत परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, विरोधकांनी यावर आक्षेप घेतला असून चौकशी समिती निव्वळ फार्स होती. मोपलवार यांना क्लिन चिट देण्यासाठी ही चौकशी समिती होती असा आरोप काँग्रेसने केला.