Breaking News

अवैध दारू विक्री करणाऱ्या पाच ठिकाणी छापेमारी.


प्रतिनिधी / श्रीगोंदे :-- श्रीगोंदे तालुक्यातील काष्टीत चालू असलेल्या अवैध दारू विक्री करणाऱ्या पाच ठिकाणी व दोन जुगार अङ्ङ्यावर पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी छापा टाकून सुमारे 30 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केला आहे. 
याबाबत मिळालेली माहिती अशी की, काष्टी येथील भैरवनाथ मंदिराच्या आङोशाला तीर्र्ट जुगार खेळत असताना संतोष बागवान, ,फिरोज शेख ,संदिप पवार, पप्पु पाचपुते यांना श्रीगोंदे पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकङून त्यांच्याकडे रोख रक्कम व मुद्देमाल हस्तगत केली. तसेच राजवाङ्यातील पङक्या वाङ्यात दिपक शिरवाळे ,मधुकर जगताप, संजय साबळे, विजय थोरात ,दादा खरात ,विठ्ठल कोकाटे, किशोर ङोळे ,संजय कचरे हे तिरट जुगार खेळताना पकडून त्यांच्याकडून ही रोख रूपये हस्तगत केले.