Breaking News

छाप्यादरम्यान अटक केलेल्या तिघांना पोलीस कोठडी

ठाणे, दि. 17, डिसेंबर - धान्यांची विक्री करणार्‍या नामांकीत पटेल यांच्या गोडाऊनवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यादरम्यान अटक करण्यात आलेल्या तिघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अंबरनाथ एमआयडीसी येथील गोडाऊनवर छापा टाकून गव्हाचा साठा जप्त केला होता. 


याप्रकरणी धान्य दुकानदार शंकर मदार, टेम्पोचालक सॅम्युल जंगम आणि पटेल रिटेलचा सुपरवायझर नंदु महेश्‍वरी या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना न्यालयासमोर हजर करण्यात आले होते. जप्त करण्यात आलेल्या गव्हाची किंमत 11 लाख 13 हजार 50 रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.


धान्यांचा काळाबाजार होत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पटेल यांच्या गोडाऊनमध्ये शासकीय अनुदानित गव्हाचा साठा असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर त्यांनी कारवाई करत तिघांना अटक केली.