Breaking News

जखमी अवस्थेत सापडले दोन दिवसांचे अर्भक


ठाणे, दि. 20, डिसेंबर - डोंबिवलीतील ग्रामीण भागात पागड्याच्या पाड्याजवळ दोन दिवसांचे जिवंत अर्भक आढळून आले. हे अर्भक जखमी स्थितीत असून ते स्त्री जातीचे असल्याचे सांगण्यात येत आहे. 
खोणी ग्रामपंचायतीचे सरपंच हनुमान ठोंबरे यांनी जखमी अवस्थेतील या अर्भकाला डोंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याच्यावर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले. सदर घटना उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस हद्दीतील असून अद्याप पोलीस रुग्णालयात आलेच नाहीत, असे सरपंच हनुमान ठोंबरे यांनी सां गितले.