Breaking News

रिंकू राजगुरूच्या नव्या चित्रपटाचे नाव जाहीर

नाशिक, दि. 20, डिसेंबर - सैराटमधून प्रत्येकाच्या मनात घर केलेली आर्ची अर्थात रिंकू राजगुरू राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मकरंद मानेच्या नव्या चित्रपटात चमकणार असल्याचं सर्वांना कळलंच आहे. पण या चित्रपटाचं नाव काय हे गुलदस्त्यात ठेवण्यात आलं होतं. या चित्रपटाचं नाव कागर असे आहे.


या चित्रपटाचे कास्टिंग डिरेक्टर हेचे योगेश निकम आहेत. तर सहाय्यक दिग्दर्शनासाठी ऋषीकेश सरोदे आणि हर्षवर्धन भालेराव या नाशिकच्या कलावंतांचा समावेश आहे. या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते शंतनू गंगणे असून निर्मिती व्यवस्थापकाचे काम नाशिकचा प्रतिक नाईक बघणार आहे.

रिंकू आणि मकरंदच्या या नव्या चित्रपटाचं नाव आणि त्याचा फाँट नुकताच सोशल मीडियात लाँच करण्यात आला. या नावाच्या केलेल्या डिझाईनवरून चित्रपटाविषयी काही अंदाज व्यक्त करता येतात. ’कागर’ ह्या नावाचा फाँट हा बघताक्षणी अ‍ॅग्रेसिव्ह वाटतो. सध्या जगात या विचारसरणीचा जास्त प्रभाव वाहतो आहे. तसेच या डिझाईनमध्ये उधळलेला गुलाल हा कुतूहलतेचा प्रश्‍न आहे, गुलाल कायम विजयाचा रंग आहे.

 हा विजय नक्की कोणावर आहे. यामध्ये केलेली मात ही असुरावर आहे, की स्वतःमध्ये अडकलेल्या आपल्यावर आहे. याचा अंदाज आपण हे नाव बघून बांधू शकतो. ’कागर’ या नावावर असलेले पांढरे डाग कदाचित उपरेपणाचे जाण करून देतात. आपण ज्या ठिकाणी आहोत तिथे आपले अस्तित्व या डागांसारखे तुरळक आहे अशी जाणीव या पांढर्‍या डागांमुळे होत राहते. 

तसेच काही ठिकाणी रक्ताचा ओघळ दिसत आहे, जो एका फांदीतून बाहेर पडलेला दिसतोय. ज्यातून या चित्रपटात बरीच नाट्यमयता आहे, याची शक्यता नाकारता येणार नाही. या चित्रपटात रिंकूसह बाकी कलाकार कोण आहेत, याचा तपशील लवकरच जाहीर केला जाणार आहे. ’उदाहरणार्थ निर्मित’चे सुधीर कोलते आणि विकास हांडे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.