मुलींना संवादातून प्रोत्साहन देण्याची आवश्यकता : प्रा. बेडेकर
लोणी येथे वार्षिक स्नेहसंमेलनप्रसंगी ते बोलत होते. या स्नेहसंमेलनात विद्यार्थिनींचा ‘रंगारंग’ संगीत- नृत्याविष्कार आणि कलागुणाबरोबरच विविध स्पर्धेतील बक्षिसांचे वितरण पार पडले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, लोणीच्या सरपंच मनीषा आहेर, वरिष्ठ पोलीस अधिकारी लता शिरसाठ, वैशाली पठारे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक के. पी. नाना आहेर, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, शिक्षणाधिकारी प्रा. शिवाजी रेठरेकर, प्रा. विजय आहेर, प्राचार्या संगीता देवकर, स्वाती लोखंडे, सयाराम शेळके, सुधीर मोरे, टी. एन. घुगरकर, स्मिता मैड आदी उपस्थित होते. प्रारंभी भारती देशमुख यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. जयश्री भोंडे आणि प्रा. सोमनाथ भुसाळ यांनी स्वागत केले. प्राचार्या लीलावती सरोदे यांनी वार्षिक प्रगतीचा अहवाल सादर केला. सुजाता मोरे आणि नूतन बोडखे यांनी सूत्रसंचालन केले. अनिता नळे यांनी वार्षिक उपक्रमाचे सादरीकरण केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.