Breaking News

एकतर्फी प्रेमातून तरुणीची आत्महत्या


लातूर : 'माझ्यासोबत लग्न कर नाहीतर मी मरून जाईन' म्हणत त्रास देणाऱ्या तरुणाच्या त्रासाला कंटाळून शुभांगी बिराजदार ( २१) या तरुणीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २४ डिसेंबर रोजी सायंकाळी निलंगा तालुक्यातील मन्नाथपूर येथे घडली.

निलंगा तालुक्यातील मन्नाथपूर येथील शुभांगी बिराजदार ही तरुणी निलंगा येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात तृतीय वर्गात शिकत होती. गेल्या एक वर्षांपासून गावातील युवक सुनील येवते हा तिचा पाठलाग करत 'माझे तुझ्यावर प्रेम आहे, माझ्याशी लग्न कर' म्हणत त्रास देत होता.

१० डिसेंबर रोजी शुभांगीला पाहण्यासाठी पाहुणे येऊन गेल्यावर सुनीलने शुभांगीला 'तू माझ्याशीच लग्न कर, नाहीतर मी तुला पळवून नेतो' अशी धमकी दिली. सदरील प्रकार शुभांगीने घरी सांगितल्यानंतर सुनीलच्या आईला बोलावून मुलाला समजावून सांगा, असे सांगण्यात आले. तरीही त्रास सुरूच असल्यामुळे या त्रासाला कंटाळून रविवारी (दि.२४) सायंकाळी आई वडील शेतात गेले असताना शुभांगीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.