बनावट पास विकले ; आणखी दोन तरुण गजाआड
छत्तीसगढ येथील बांधकाम व्यावसायिक विनितासिंह सुधीशसिंह साईदर्शनासाठी आले होते. त्यावेळी या दोघांनी १ हजार ६०० रुपये घेऊन बनावट पास देत दहा मिनिटांत साईदर्शन करून देतो, असे सांगितले. दरम्यान, हे साईभक्त दर्शनासाठी गेले असता हा पास बनावट असल्याचे सुरक्षा रक्षकांनी सांगितले. फसवणूक झाल्याचे साईभक्तांच्या लक्षात आल्यानंतर साईबाबा संस्थानचे सुरक्षा रक्षक रामदास धिवर यांनी साईभक्तांना बरोबर घेत दोघा भामट्यांना पकडले. त्यांना घेऊन शिर्डी पोलिसांच्या देण्यात आले. साईभक्तांनी दिलेल्या तक्रारी वरून गणेश खरात व त्याचा सहकारी नानासाहेब साळुंके या दोघांच्या विरोधात साईभक्ताने तक्रार दाखल दिली.