तक्रारदार माजी सरपंचास मारहाण
तक्रारदार बाळासाहेब जाधव यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे हलवण्यात आले. अद्याप रात्री उशिरापर्यंत पाथर्डी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालेला नव्हता. त्यामुळे अधिकृत माहिती भेटू शकली नाही. तालुक्यातील शंकरवाडी येथील तक्रारदार माजी सरपंच बाळासाहेब जाधव यांनी विद्यमान सरपंच अशोक दहातोंडे यांच्यावर अनधिकृतपणे शौचालय व घरकुल योजनेचा लाभ घेतला. असल्याचा आरोप केला असून, याबाबत जिल्हा परिषद व पाथर्डी पंचायत समितीकडे लेखी तक्रारी दाखल करून चौकशी करण्याची मागणी जाधव यांनी केली होती.
