Breaking News

अवैध वाळू वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई


पुणे, दि. 11, डिसेंबर - गौण खनिजाचा अवैध उपसा करणार्‍या वाहनांवर महसूल विभागाने धडक कारवाई केली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर यवत आणि दौंड परिसरातून अवैध वाळूची वाहतूक करणारे 10 ट्रक पथकाने पकडले आहेत.जप्त करण्यात आलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.