Breaking News

तरुणांनी गीतेचे ज्ञान आत्मसात करावे : ह भ प ठाकरे महाराज


कोपरगाव / प्रतिनिधी-मनुष्याला पुढील जन्म त्याच्या कर्मानुसारच मिळतो. म्हणून तरुणांनी गीतेचे ज्ञान आत्मसात करावे, असे प्रतीपादन ह भ प शिवाजी महाराज ठाकरे यांनी भोजडे येथे कीर्तन महोत्सवात केले. कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथे गुरूचरीत्र पारायण सोहळा व कीर्तन महोत्सव सुरु आहे. यावेळी उपस्थित भाविकांना संबोधित करतांना ते बोलत होते.
ते म्हणाले की, ज्याच्या त्याच्या कर्मावर पुढच्या जन्माची गती अवलंबून असते. आज जे कर्म आपण करतो. त्याचे संचित होते. तेच पुढील जन्मात दिसून येते. म्हणून चांगले कर्म केले तर चांगलेच फळ मिळते. साधू संतानाही कर्माचे भोग चुकले नाही. तर मनुष्यमात्रांचे काय? फळाची अपेक्षा न धरता कर्म करीत जावे, असे गीतेत सांगितले आहे. 


 श्रीमदभग्वद्गीता हा जगातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. आपला समाज आपल्याच अमूल्य तत्वज्ञानाकडे सोईस्कर दुर्लक्ष करतो. हे समाजाचे पर्यायाने देशाचे दुर्दैव आहे. गीताजयंतीनिमित्ताने भारतीयांनी गीताभ्यास सुरु केला तर गीताजयंती आपोआपच साजरी होईल. यावेळी गणेशशास्त्री महराज, ह. भ .प. बाळकृष्ण सुरासे, पावडे महाराज, प्रकाश गायकवाड, लकारे महाराज, नकुल जाधव, भाऊसाहेब सिनगर, नानासाहेब सिनगर, प्रा. ठोंबरे आदींसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.