घरफोडी करुन 17 तोळे सोने लंपास
सोलापूर, दि. 11, डिसेंबर - वडिलांच्या मासिक श्राद्धासाठी मोहोळला गेलेल्या महावितरणमधील उपकार्यकारी अभियंता युवराज उत्तम मोरे यांच्या बंगल्यात चोरांनी प्रवेश करुन सुमारे 17 तोळे सोन्याचे दागिने, दहा हजार रोख असा एकूण सुमारे सव्वापाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. खमितकर अपार्टमेंटजवळील यशनगर भाग एक मधील हा प्रकार आहे.
मोरे यांच्या वडिलांचे तीन महिन्यांपूर्वी निधन झाले. मासिक श्राद्ध असल्यामुळे ते मोहोळला रात्री परिवारासह गेले होते. घराच्या आतील दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून हा ॅलमधील कपाटातील दागिने, रोकड चोरांनी काढून घेतली. मौल्यवान वस्तू धुंडाळताना चोरांनी कपाटातील कपडे अन्य वस्तू अस्ताव्यस्त टाकून दिल्या. मोरे यांना ही माहिती क ळताच ते घरी परतले. फौजदार चावडी पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांचे श्वानपथक, ठसे पथक आले. तसेच गुन्हे शाखा, वरिष्ठ अधिकारीही आले होते. पथकातील श्वान गेटपर्यंतच घुटमळले. ठसे घेण्यात आले. सहायक निरीक्षक गोविंद पांढरे तपास करीत आहेत.
शहरात दररोज चोर्यांचे सत्र सुरूच आहे. माजी जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांच्या घरात 23 तोळे, दाते गणपतीजवळ 17 तोळे, नवी पेठेतील रेडिमेड कापड दुकान, विजापूर रोडवरील सैफुल परिसरात चार घरांतून दहा तोळे, रूबीनगरात तीन घरांतून सात तोळे आज पुन्हा 17 तोळे दागिने चोरीला गेले आहे. अशा अनेक घटनांची मालिका सुरूच आहे. फक्त चाटला साडी सेंटर दुकानात झालेली चोरी उघडकीस आली असून पन्नास हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.