Breaking News

हिमाचलमध्ये कमळ उमललं, काँग्रेसचा पराभव

हिमाचल प्रदेशच्या मतमोजणी केंद्रावर आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास मतमोजणीला सुरूवात झाली. सुरूवातीपासूनच कल भाजपकडे झुकलेला होता. नंतर भाजपनेही आघाडी कायम ठेवली असून आता 39 जागांवर भाजप आघाडीवर आहे. 


त्यामुळे त्यांचा विजय हा निश्चितच मानला जातोय.तर दुसरीकडे काँग्रेसला मात्र पराभवाचा सामना करावा लागत असून गेल्या वेळच्या तुलनेत तब्बल 10हून अधिक जागा कमी झाल्या आहेत . 2012 साली काँग्रेसला 36 तर भाजपला 26 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे यावेळी भाजपला 35 हा बहुमताचा आकडा अगदी सहज पार करत आला आहे. तर अपक्ष पाच जागांवर आघाडीवर आहेत.

हिमाचल प्रदेशमध्ये एकदा जिंकलेला पक्ष पुन्हा कधीच सत्तेत येत नाही. गेल्या 32 वर्षांपासूनही परंपरा कायम आहे. त्यामुळे एकदा भाजप तर एकदा काँग्रेस सत्तेत येते. यावेळी पुन्हा भाजप सत्तेत येईल असं चित्र स्पष्ट झालंय. पण भाजपचे माजी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेम कुमार धुमर मात्र पिछाडीवर आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह मात्र आघाडीवर आहेत.