Breaking News

आंदोलनादरम्यान शेतक-याचा विष घेण्याचा प्रयत्न

जालना  दि. 18, डिसेंबर - पीक विमा मिळावा यासाठी केलेल्या ठिय्या आंदोलनादरम्यान एका शेतक-याने विष घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. निवृत्ती शेवाळे असे त्या शेतक-याटे नाव आहे. मात्र पोलिसांनी त्याला अडवल्यामुळे त्याचा जीव वाचला असल्याचे सांगण्यात येत आहे. 

या घटनेनंतर बँक व्यवस्थापकांनी पीक विमा रक्क म वाटप करण्याचे लेखी आश्‍वासन दिले. त्यानंतर शेतकर्‍यांनी आपला संप मागे घेतला.भोकरदन तालुक्यातील राजूर येथील ग्रामीण बँकेसमोर शेतकर्‍यांनी 3 तास पीक विमा मिळण्यासाठी ठिय्या आंदोलन केले होते. मात्र बँक दखल घेत नसल्याने हताश झाल्यामुळे शेतकर्‍याने विष घेण्याचा प्रयत्न केला.