बिया खाल्ल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा
बदामाच्या बिया समजून विद्यार्थ्यांनी चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने काही वेळानंतर विद्यार्थ्यांना मळमळ वाटू लागले. याचदरम्यान २६ विद्यार्थ्यांना उलटीचा त्रास जाणवू लागला. काही वेळातच प्रकृती अत्यवस्थ झाली आणि शाळा व्यवस्थापनामध्ये एकच धावपळ उडाली. विषबाधा झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांना संध्याकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी भरती करण्यात आले.
Post Comment