Breaking News

माजी मंत्री आ. जयंत पाटील यांना मातृशोक

राहुरी प्रतिनिधी - माजी मंत्री, आ. जयंत पाटील यांच्या मातोश्री श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील (वय ९५) यांचे आज दुपारी निधन झाले. मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात गेले दोन आठवडे त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज {दि.२९} दुपारी अचानक १ वाजून ४५ मिनिटांनी उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
सातारा जिल्ह्यातील चऱ्हेगाव येथील एका साध्या आणि शेतकरी कुटुंबात १९२२ साली त्यांचा कृष्णराव माने यांच्या कुटुंबात झाला. १ भाऊ ४ बहिणी असा परिवार होता. लोकनेते राजारामबापू पाटील यांच्याशी दि.२६ मे १९४६ रोजी त्यांचा अत्यंत साध्या आणि गांधी पद्धतीने त्यांचा विवाह झाला होता. विवाहानंतर लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या राजकीय, सामाजिक वाटचालीत त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते. कुसुमताई या 'आईसाहेब' या नावाने सुपरिचित होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्थानी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या पश्चात उद्योजक भगतसिंग पाटील, आ. जयंत पाटील यांच्यासह कन्या राहुरीच्या माजी नगराध्यक्ष डॉ. उषाताई प्रसाद तनपुरे, विजया फत्तेसिंग जगताप (शिवाजीनगर, पुणे), नीलिमा नरेंद्र घुले-पाटील, (अहमदनगर) या ३ विवाहित मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. उद्या (शनिवार) सकाळी साडेनऊ वाजता कासेगाव (ता. वाळवा) येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.