Breaking News

पिंप्री लौकी अजामपुर सप्ताहात हजारो भाविंकांची मांदीआळी

सात्रळ/प्रतिनिधी - संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकी अजमपुर येथे सुरू झालेला ब्रम्हलीन माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज फिरता नारळी सप्ताहास २४ नोव्हेंबर पासून सुरूवात झाली असुन या फिरत्या सप्ताहाचे आयोजन महंत मठाधिपती दत्तगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व पिंप्री लौकी अजमपुर पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले आहे. 


सप्ताहात दररोज संगमनेर,राहाता, पारनेर,राहुरी,आकोले आदि तालुक्यातील भाविक हजेरी लावत असुन मोठ्या प्रमाणात अन्नदान व प्रसादाचा लाभ घेत आहे.सप्ताहास सुरूवात झाल्यापासून पिंप्री लौकीत हरीनामाच्या गजराने भक्तीमय वातावरण निर्माण झाले असुन दररोज अन्नदान होत आहे. तसेच प्रवचन , किर्तन, हरीजागर, काकडा,भजन,हरीपाठ, होत असल्याने या सप्ताहात नऊ ते दहा हजार भाविक उपस्थित राहुन भक्तीचा व अन्नदानाचा लाभ घेत आहे. या सप्ताहात जास्तीत जास्त भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन मठाधिपती महंत दत्तगिरी महाराज व नियोजन कमिटी , सप्ताह कमिटी यांनी केले आहे.

या सप्ताहात चोवीस तास अखंड भजनाच्या अभंगवाणी ने तसेच टाळ मृदंग गजराने पिंप्री लौकीत पंढरी अवतरली आहे. सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी सात हजार भाविकांनी हजेरी लावली. सप्ताहाची सुरूवात श्री क्षेत्र उंबरेश्वर येथुन मोटर सायकल रॅलीने करत वंरवंडी शिबलापुर आश्वी खुर्द आश्वी बु॥ प्रतापुर दाढ बु॥ दाढ खुर्द खळी व सप्ताहस्थळी पिंप्री लौकी अजामपुर येथे आली तसेच या रॅली बरोबर मंहतं दत्तगिरींची रथातुन भव्य मिरवणुक काढण्यात आली व पताका ध्वज पुजन करून होम हावन विधीवत पुजन करून करण्यात आले. 

यावेळी मठाधिपती दत्तगिरी महाराज बोलताना म्हणाले की, माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज फिरता सप्ताहाचे प्रमुख वैशिष्ट्य देने को अन्नदान, लेने को हरीनाम असुन वार करी धर्मात अंखड हरिनामसप्ताहाला मोठी पंरपंरा असुन कुठल्याही आदेशाला भाविक बांधलेला नसताना शांततेत भगवंताचे नामस्मरण करतो हे वैशिष्टये असुन या सप्ताहात गरिबी श्रीमंती दिसत नाही दिसते ते फक्त नामस्मरण असे सांगत सप्ताहाला जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी होउन लाभ घ्यावा असे आवाहान केले. 

सप्ताहाच्या पहिल्या दिवशीचे किर्तन रूपी पुष्प ह.भ.प नामदेव महाराज लबडे , दुसरे पुष्प ह.भ.प परसराम महाराज अनथेॅ , तिसरे पुष्प ह.भ.प.मधुसुदन महाराज यांनी किर्तन रूपी सेवेतुन वारकरी भाविकांना जीवनात आपले कार्य कसे असावे , माणसाचे जीवन कशासाठी व जीवनात येउन काय केले पाहिजे असे कृतज्ञ ज्ञान अमृतमय उपदेश दिला . सप्ताह काळात रोज परिसरातील गावातुन आमटी भाकरी चे अन्नदान होत असुन भाविक या महाप्रसादाचा लाभ घेत आहे. काल्याचे किर्तन मठाधिपती ह भ प दत्तगिरी महाराज यांचे १ डिसेंबर रोजी होणार आहे .तसेच काल्याच्या महाप्रसादाचे आयोजन पिंप्री लौकी ग्रामस्थांच्या वतीने अंदाजे २० ते २५ हजार भाविकांच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सप्ताह कमिटीने सांगितले.