मस्तानशाह सोशल क्लब आयोजित खुली कॅरम टुर्नामेंट उत्साहात
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील कोठला येथे मस्तानशाह सोशल क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खुल्या कॅरम टुर्नामेंटमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत अख्तर कुरेशी (गड्डा) यांनी अंतिम विजेतेपद पटकाविले. कोठला येथे सहा दिवस चाललेल्या कॅरम टुर्नामेंटमध्ये शहरातील 64 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
मरहुम मुन्ना सय्यद यांच्या स्मरणार्थ कोठला येथील क्लासिक कॅरम हाऊस मध्ये या स्पर्धा खेळविण्यात आल्या. टुर्नामेंटचा अंतिम सामना अख्तर कुरेशी विरुध्द समद कुरेशी यांच्यात अत्यंत अटातटीचा झाला. यामध्ये अख्तर कुरेशी यांनी विजय संपादन केले. टुर्नामेंटचे विजयी खेळाडू अख्तर कुरेशी यांना नगरसेवक मुदस्सर शेख व सामाजिक कार्यकर्ते नसिर शेख अब्दुल्ला यांच्या हस्ते चषक व रोख बक्षिस देण्यात आले.

यावेळी निसार बागवान, मोहसीन शेख, चंद्रकांत उजागरे, तन्वीर पठाण, राजू ठेकेदार, तस्सवर मिर्झा, समी जहागीरदार, राजू फकरोद्दीन, आलिम सय्यद, इरफान शेख, राजू सय्यद आदि उपस्थित होते. तसेच द्वितीय विजेता समद कुरेशी, तृतीय- अय्युब सय्यद, उत्तेजनार्थ राजू फकरोद्दीन यांना स्मृतीचिन्ह व रोख स्वरुपाचे बक्षिसांचे वाटप उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. टुर्नामेंटचा बेस्ट खेळाडू ठरलेला संतोष सुर्यवंशी याचा देखील यावेळी गौरव करण्यात आला.
प्रास्ताविकात शैबाज खान यांनी कॅरमच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले. नसिर शेख अब्दुल्ला म्हणाले की, युवा वर्ग सोशल मिडीयाच्या विश्वात रमला असून, त्याला योग्य दिशा देण्याची गरज आहे. शाररीक व बुध्दीला चालना देणार्या खेळ खेळले पाहिजे. कॅरम खेळाने बुध्दीला चालना मिळून, निर्णय क्षमता व नियोजनात्मक गुण वाढीस लागत असल्याचे ते म्हणाले. नगरसेवक मुदस्सर शेख यांनी विजयी खेळाडूंना शुभेच्छा देवून, जिल्हास्तरीय कॅरम टुर्नामेंट स्पर्धेसाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले.
कॅरम टुर्नामेंट पहाण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शेवटचा सामना संपताच फटाक्यांच्या आतषबाजीत तर ढोल ताश्यांच्या गजरात विजयी खेळाडूंनी जल्लोष केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नदीम इनामदार यांनी केले. आभार आलिम सय्यद यांनी मानले.