सेझसाठी २४ कंपन्या करणार ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक
या ठिकाणी ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होईल व सव्वा ते दीड लाख लोकांना त्यामुळे रोजगाराच्या संधीही तेथे प्राप्त होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे २०१४ मध्ये या सेझच्या सुविधेचा शिलान्यास केला होता.
गडकरी म्हणाले की, एका कंपनीने या संबंधात प्रतिज्ञापत्रही दिले असून त्यांनी ६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्या कंपनीच्या गुंतवणुकीमुळे सुमारे ४० हजार लोकांना रोजगार मिळणार आहे.
