Breaking News

२०१८ साली देशात नोकऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता

पुढील वर्षात म्हणजे २०१८ साली देशात नोकऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याचे संकेत मिळत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नोकऱ्या घटल्या गेल्याच्या संबंधातील आरोप व वास्तवामुळे निर्माण झालेल्या स्थितीबाबत सरकारला दिलासा मिळू शकेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


या वर्षी सध्या देशातील विविध कॉलेजमध्ये चालू असलेल्या कॅम्पस प्लेसमेंटची स्थिती सुधारली असून त्यामुळे हे चांगल्या स्थितीचे संकेत असल्याचे मानले जात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी प्री प्लेसमेंट ऑफर्समध्ये २५-३० टक्के वाढ झाली आहे. उदाहरण द्यायचे झाले, तर ॲमेझॉनमध्ये या वेळी २५ टक्के वाढ या नोकऱ्यांमध्ये झाली असून या वेळी कंपनीने ९० पेक्षा जास्त महाविद्यालयांमध्ये जाऊन नोकऱ्यांची संधी विद्यार्थ्यांना देऊ केली. 

आयआयटी मुंबईमध्ये आतरराष्ट्रीय स्तरावर देऊ केलेल्या नोकऱ्यांची संध्याही गेल्यावर्षीपेक्षा वाढली आहे. ५० वरून ६० इतकी ही संख्या गेली आहे. अमेरिका व ब्रिटनच्या काही कंपन्यांनी प्रथमच भारतात नोकऱ्यांच्या या प्लेसमेंट उपक्रमात सहभागी होऊन नोकऱ्यांच्या संधी विद्यार्थ्यांना देऊ केल्या.