Breaking News

जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

वाशिम जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाची प्रभावी अंमलबजावणी झाली असून याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाचे कौतुक केले. तसेच जिल्ह्यातील नद्या पुनरुज्जीवनाच्या कामांसाठी कार्पोरेट सोशल रिस्पॉन्स (सीएसआर) फंडातून निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.


जिल्ह्यातील धडक सिंचन, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सुरु असलेल्या सिंचन विहिरींच्या कामांचाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला. सहस्त्र सिंचन विहीर योजनेंतर्गत सुरु असलेल्या विहिरींच्या कामांना गती देण्याच्या सूचना यावेळी त्यांनी केल्या.