Breaking News

कर्जमाफी दिल्याबद्दल पिंपळगावात शेतकर्‍यांनी व्यक्त केली कृतज्ञता

नांदेड, दि. 13, डिसेंबर - राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकर्‍यांना दिलासा देणारी कर्जमाफी जाहीर केल्याबद्दल नांदेड तालुक्यातील पिंपळगाव (निमजे) येथील शेतकर्‍यांनी राज्य सरकारचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त करुन अभिनंदन केले.


कर्जदार शेतकर्‍यांच्या जीवनातील दु:खाचा भार हलका करण्याचा प्रयत्न राज्य सरकाने केला आहे. नांदेड तालुक्यातील पिंपळगाव निमजे या गावातील शेतकरी विठ्ठल गंगाराम डक , गंगाधर धर्माजी डक कर्जदाराची पत्नी श्रीमती ताराबाई गंगाधर डक, रामजी सिताराम डक (निधन) यांचा मुलगा माधव रामजी डक, मधुकर व्यंकटराव पुंड यांची पत्नी श्रीमती सुनिता मधुकर पुंड , पार्वतीबाई शंकरराव डक, दिलीप व्यंकटराव पुंड यांचे भाऊ प्रतापराव पुंड यांची मुलाखत घेण्यात आली. 


श्रीमती सुनिता पुंड यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेडून 40 हजार रुपयाचे कर्ज घेतले होते. हे कर्ज शासनाकडून पूर्णपणे माफ झाल्याबद्दल राज्य सरकारचे आभार व्यक्त केले. सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन प्रतापराव पुंड यांनी सेवा सहकारी सोसायटीचे 30 लाभार्थी असून 20 शेतकर्‍यांचे 25 टक्के कर्ज माफ झाले असून तर 10 सभासदांना पूर्ण कर्ज माफी मिळाली आहे. 

कर्ज माफ झालेल्या शेतकर्‍यांना बेबाकी प्रमाणपत्र व नवीन कर्ज मिळणार असून सावकारी, आडतीवर पैसे उचलण्याची आता गरज राहिली नाही. त्यांना क ोणत्याही बँकेकडून शेतीसाठी कर्ज मिळू शकते. ही कर्ज माफी दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला.