Breaking News

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत हिशेब सादर न केलेल्या 494 उमेदवारांना नोटीसा

अहमदनगर, दि. 14, डिसेंबर - नगर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात 205 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या.या निवडणुकीत बहुतांश उमेदवारांनी आपल्या निवडणुक खर्चाचे हिशेब जिल्हा निवडणुक कार्यालयाकडे निर्धारित वेळेत सादर केले.मात्र 494 उमेदवारांनी हिशेब सादर न केल्याने अहमदनगरचे प्रभारी जिल्हाधिकारी विश्‍वजित माने यांनी या सर्व उमेदवारांना लेखी नोटीसा जारी केल्या आहेत.


संबंधित उमेदवारांकडून नोटीसला लेखी खुलासा सादर करण्यात आल्यानंतर या संदर्भात सुनावणी घेतली जाणार आहे.नोव्हेंबर व डिसेंबर 2017 मध्ये मुदत संपत असलेल्या 205 ग्रामपंचायतींच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात घेण्यात आल्या होत्या. निवडणुक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुक ीसाठी उमेदवारांना खर्चाची मर्यादा निश्‍चित करून दिली होती.तसेच दिलेल्या मर्यादेमध्येच खर्च करून उमेदवारांनी आपला निवडणुकीचा खर्चाचा हिशेब निवडणक विभागाकडे सादर करणे बंधनकारक आहे.

निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर निर्धारित वेळेतच हा खर्चाचा हिशेब सादर करणे उमेदवारांसाठी अनिवार्य करण्यात आले होते.त्यानुसार 4 हजार 354 उमेदवारांनी आपला निवडणुक खर्चाचा हिशेब 8 नोव्हेंबर पर्यंत निर्धारित वेळेत सादर केला.मात्र 494 उमेदवारांनी हिशेब सादरच केला नाही. 

या पाश्वभूमीवर प्रभारी जिल्हा धिकारी विश्‍वजित माने यांनी या सर्व उमेदवारांना नोटीसा जारी केल्या असून निर्धारित वेळेत खर्चाचा हिशेब सादर का केला नाही,अशी विचारणा केली आहे.आता या उमेदवारांना लेखी खुलासा सादर करणे बंधनकारक असून उमेदवारांकडून लेखी खुलासा प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी स्वत: या संदर्भातील सुनावणी घेतील अशी माहिती मिळाली आहे.