भाजपला जाहीरनाम्याचा विसर : हार्दिक पटेल
गांधीनगर/वृत्तसंस्था : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान अवघ्या काही तासांवर आलेले असतानाही भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही. यावरुन विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका सुरु केली आहे. काँग्रेसनंतर आता पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने ही भाजपवर निशाणा साधला आहे.
गुजरातच्या विकासाबद्दल काहीच व्हिजन त्यांनी लोकांसमोर ठेवले नाही. कदाचित सीडी बनवण्याच्या चक्करमध्ये भाजप जाहीरनामा विसरली.’ असा टोला हार्दिकनं यावेळी लगावला नोव्हेंबर महिन्यात हार्दिक पटेलचा एक कथित सीडी यू-ट्यूबवर व्हायरल झाली. या व्हायरल व्हिडीओमध्ये दावा करण्यात आला होता की, या व्हिडीओमध्ये असणारा व्यक्ती हा हार्दिक पटेल असून त्याच्यासोबत एक तरुणीही आहे.
या व्हिडीओवरुन गुजरातमध्ये राजकारण चांगलंच तापलं. त्यामुळेच हार्दिकने आता अशा पद्धतीने निशाणा साधला.दरम्यान, भाजपच्या जाहीरनाम्यावरुन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी देखील भाजपवर निशाणा साधला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्याचा प्रचारही संपला. तरीही भाजपने जनतेसाठी कोणताही जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही. गुजरातच्या भविष्यासाठी भाजपने कोणतेही व्हिजन मांडलेले नाही. अशी टीका राहुल गांधींनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन केली आहे.
सध्या ट्विटरवर ‘बीजेपी का मेनिफेस्टो किधर है’ हा सवाल ट्रेंडिंगमध्ये आहे. त्यामुळे विकासाची भाषा करणारे सध्या नीच शब्दाचे राजकारण करण्यात अडकल्याचे हार्दिकने म्हटले आहे. गुजरातमध्ये 182 विधानसभा जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात आज 9 डिसेंबर पासून सकाळी 8 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 89 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. तर दुसर्या टप्प्यात 93 जागांसाठी 14 डिसेंबरला मतदान होईल. तर 18 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्याचा प्रचारही संपला. तरीही भाजपने जनतेसाठी कोणताही जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही. गुजरातच्या भविष्यासाठी भाजपने कोणतेही व्हिजन मांडलेले नाही.’ अशी टीका राहुल गांधींनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन केली आहे.
हार्दिक पटेलने ट्विटरवरुन भाजप आणि मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘गुजरातमध्ये विकासासोबत जाहीरनामाही गायब झाला आहे. साहेब तुम्हाला कोणी काहीही बोलणार नाही. कृपया तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या स्टाइलमध्ये जाहीरनामा फेका’ असे ट्वीट करत हार्दिक पटेलने भाजप व पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
89 जागांसाठी आज मतदान
गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज शनिवारी 9 डिसेंबरला होणार आहे. विधानसभेच्या 182 जागांपैकी 89 जागांसाठी हे मतदान होईल. मुख्यमंत्री विजय पानी यांच्यासह 977 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रचाराच्या शेवटच्या काही तासात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी रॅली काढत शक्तीप्रदर्शन करण्यावर भर दिला.
