Breaking News

शिवसेना गटनेत्याच्या कार्यालयातील संगणक ’जप्त’

पुणे, दि. 16, डिसेंबर - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांच्या कार्यालयातील संगणकाचा त्यांच्या अनुपस्थितीत गैरवापर होत असल्याचे कारण पुढे करत प्रशासनाने कार्यालयातील संगणक काढून नेला आहे. हा प्रकार (शुक्रवारी) सकाळी घडला. दरम्यान, गटनेते किंवा त्यांच्या स्वीय सहायकाला तसेच कार्यालयीन शिपाई यांना याबाबत कुठलीच कल्पना न देता प्रशासनाने संगणक काढून नेला आहे. त्यामुळे प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे.


पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिसर्‍या मजल्यावर महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, विविध विषय समितींचे सभापती यांची कार्यालये आहेत. याच मजल्यावर शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांचे कार्यालय आहे. माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर या कार्यालयात निवेदन तयार करत होते. त्यामुळेच शिवसेना गटनेत्याच्या कार्यालयातील संगणक प्रशासनाने काढून घेतला असल्याची, जोरदार चर्चा पालिका वर्तुळात रंगली होती.