पाथर्डीमध्ये मायलेकांस कुऱ्हाडीने मारहाण
पाथर्डीमधील कुलरवाडी परिसरातील शिवाजी दहिफळे हे नदीच्या कडेची माती जेसीबीच्या साहाय्याने वादातीत असणाऱ्या जमिनीच्या बांधावर टाकत असताना तेथे उपस्तिथ उमेश दहिफळे आणि त्यांच्या आई यांनी शिवाजी यांस असे न करण्यासाठी समजावले असता शिवाजी यास त्याचा राग आला.
त्याने कुऱ्हाडीच्या दांड्याने उमेश दहिफळे यांस मारहाण केली. हे सोडवण्यासाठी त्याची आई मध्ये आली असता गणेश शिवाजी दहिफळे याने त्यांनाही कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली. यामध्ये उमेश आणि त्यांची आई जखमी झाल्या. याबाबत उमेश दहिफळे यांनी पाथर्डी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली असून शिवाजी नेमाजी दहिफळे, गणेश शिवाजी दहिफळे आणि अन्य दोघांवर ( सर्व राहणार कुलरवाडी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.