Breaking News

नागपूरच्या विकासात सर कस्तुरचंद यांचे महत्त्वाचे योगदान - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


सर कस्तुरचंद डागा यांचा जन्म राजस्थानच्या बिकानेर येथे झाला. मात्र नागपूर ही त्यांची कर्मभूमी राहिली आहे. येथील खाण, कपडा आणि बँकींग क्षेत्राशी निगडीत व्यवसाय मोठ्या प्रमाणात निर्माण करून त्यांनी अनेकांना रोजगार उपलब्ध करुन दिला. एकप्रकारे नागपूरच्या जीवनाला त्यांनी आकार देण्याचे काम केले. नागपूर शहराच्या विकासात सर कस्तुरचंद डागा यांचे महत्वपूर्ण योगदान आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
कस्तुरचंद पार्क येथे सर कस्तुरचंद यांच्या 100 व्या पुण्यतिथीनिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, खासदार अजय संचेती, आमदार सुधाकर देशमुख, प्रा.जोगेंद्र कवाडे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, अखिल भारतीय माहेश्वरी महासभेचे सभापती श्यामसुंदर सोनी, विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या इंग्लड येथील ॲलिसन वॉर्ने, मनपातील सत्ता पक्ष नेते संदीप जोशी आदी उपस्थित होते.