Breaking News

महोत्सवामुळे नागपूरच्या संत्र्याला वैश्विक ओळख - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


‘ऑरेंज सिटी’ म्हणून नागपूरची ओळख नेहमीच राहिली आहे. ही ओळख आता जागतिक स्तरावर नेण्यासाठी संत्रा महोत्सव महत्वाचा ठरणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून जगभरातील शास्त्रज्ञ, नागरिक येथे येतील व जागतिक संत्रा महोत्सवामुळे खऱ्या अर्थाने नागपूरच्या संत्र्याला वैश्विक ओळख मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित पहिल्या जागतिक संत्रा महोत्सवाचे उद्घाटन करतांना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी मंचावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी,केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपूरच्या महापौर नंदा जिचकार, माजी खासदार विजय दर्डा, बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष अतुल शर्मा, युपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी रज्जुभाई श्रॉफ आदी उपस्थित होते.