Breaking News

मुझफ्फरनगर दंगलींप्रकरणी माजी मंत्र्यांसह दोन आमदारांवर अटक वॉरंट

२०१३ च्या मुझफ्फरनगर दंगलींप्रकरणी स्थानिक न्यायालयाने उत्तर प्रदेशचे मंत्री सुरेश राणा, माजी केंद्रीय मंत्री संजीव बलियान तसेच भाजपा आमदार संगीत सोम आणि उमेश मलिक यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. 


या सर्व आरोपींवर खटला चालवण्याची परवानगी नुकतीच उत्तर प्रदेश सरकारने दिली होती. त्यानंतर न्यायालयाने हे पाऊल उचलले आहे. अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी मधू गुप्ता यांनी हे अटक वॉरंट जारी केले असून सर्व आरोपींना १९ जानेवारी २०१८ रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती या प्रकरणी तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

या सर्व आरोपींवर चिथावणीखोर भाषणे केल्याचा आरोप एसआयटीने ठेवला आहे. भादंवि कलम १५३ ए अन्वये त्यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी एसआयटीने उत्तर प्रदेश सरकारकडे मागितली होती.