Breaking News

सरकारी रुग्णालयाने प्रवेश नाकारल्याने नाल्याजवळ महिलेची प्रसूती!

सरकारी रुग्णालयाने कथितरीत्या प्रवेश नाकारल्यानंतर एका आदिवासी महिलेने रुग्णालय परिसरातील नाल्याजवळ अर्भकास जन्म दिल्याची घटना ओडिशातून समोर आली आहे. रुग्णालय प्रशासनाने मात्र महिलेला प्रवेश नाकारल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. 


याविषयी सविस्तर वृत्त असे की, दसमंतपूर मंडळाच्या जनीगुडा गावातील एक गर्भवती महिला शुक्रवारी तिच्या आई व बहिणीसह रुग्णालयात दाखल असलेल्या पतीला भेटण्यासाठी आली होती. यावेळी तिला प्रसवकळा सुरू झाल्या. 

त्यानंतर तिला प्रसूती विभागात नेण्यात आले असता तेथील अधिकाऱ्यांनी कागदपत्रे नसल्याच्या कारणावरून प्रवेश नाकारल्याचे तिची आई गौरमणी मुदुलीने सांगितले. कागदपत्रे नसल्याचे सांगत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तिला दाखल करून घेतले नाही. यानंतर तिने रुग्णालय परिसरातील नाल्याजवळ एका बालिकेस जन्म दिल्याचे गौरमणीने म्हटले आहे.