Breaking News

बहिरोबावाडीच्या शेतकऱ्यांचे महावितरण कार्यालयात दोन तास ठिय्या आंदोलनं


पारनेर / प्रतिनिधी /- तालुक्यातील किन्ही , बहिरोबावाडी , तिखोल , करंदी या गावांसह कान्हुरपठार उपविभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व गावांचा शेतीचा वीजपुरवठा गुरुवार,२८ डिसेंबर च्या सकाळी ७.०० वाजले पासून वीजबीलांच्या वसुलीसाठी पारनेर महावितरण कार्यालयाने बंद केल्याच्या निषेधार्थ बहिरोबावाडी येथील संतप्त शेतकऱ्यांनी भर दुपारी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल देठे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पारनेरच्या महावितरण कार्यालयात तब्बल अडीच तास ठीय्या आंदोलन केले.
या आंदोलनाची तात्काळ दखल घेत महावितरण चे कार्यकारी उपअभियंता प्रजापती यांनी कान्हुरपठार चे कनिष्ठ उपअभियंता पाटील यांना दुरध्वनीवरून खंडित केलेला वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्याचे आदेश देऊन खंडीत वीजपुरवठा सुरू करण्यात आला.त्यानंतर आंदोलकांनी आंदोलनं थांबवले.

कान्हूर पठार उपविभागाअंतर्गत येणाऱ्या किन्ही , बहिरोबावाडी , तिखोल , करंदी या गावांसह आदी गावांचा शेतीचा वीजपुरवठा महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची पुर्वसुचना न देताच गुरुवारी वीजबिल वसुलीसाठी खंडीत केला असता बहिरोबावाडी येथील संतप्त शेतकऱ्यांनी पारनेरच्या महावितरण कंपनीच्या कार्यालयात जो पर्यंत वीजपुरवठा सुरळीत केला जात नाही. 

 तो पर्यंत शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अडीच तास ठीय्या दिला. शेतकऱ्यांनी सरकार व वीज कंपनी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वीज कंपनीकडून आकारण्यात येणारे वीजबिल अतिशय सदोष व चुकीची असुन अंदाजे व मोघमपणे आकारण्यात येत असल्याने हि बिलं जो पर्यंत दुरूस्त होत नाहीत तो पर्यंत शेतकरी बिले भरणार नसल्याचे अनिल देठे पाटीलनी सांगितले.

महावितरण कार्यकारी उपअभियंता प्रजापती राळेगण सिध्दी येथे मिटिंगमध्ये असल्याने त्यांनी कान्हुरपठारचे कनिष्ठ अभियंता पाटील यांना आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी पाठवले. अभियंता पाटील यांनी आंदोलकांशी सकारात्मक चर्चा करून वीजपुरवठा सुरू केल्याने आंदोलकांनी आंदोलनं मागे घेतले.

आंदोलनात किन्हीचे सरपंच बाबासाहेब व्यवहारे , व्हा.चेअरमन छगन भांबरे , संजय व्यवहारे , पांडुरंग व्यवहारे , बापु व्यवहारे , विठ्ठल देठे , आदिनाथ व्यवहारे , बबन देठे , भास्कर देठे , मल्हारी व्यवहारे , सुनिल साबळे , सुदाम देठे , भिकाजी व्यवहारे , किरण व्यवहारे , मोहन मोढवे , संपत पवार , रोहिदास खोडदे , सुनील खोडदे , राजेंद्र व्यवहारे , बबन शिंदे , बाळु शिंदे , योगेश व्यवहारे , प्रविण व्यवहारे , पोपट व्यवहारे , संदीप व्यवहारे , संतोष व्यवहारे , कुंडलिक देठे , संजय साकुरे आदी शेतकरी सहभागी झाले होते..