Breaking News

पोलिसांना माहिती दिल्याच्या संशयावरून जिवे मारण्याची धमकी


अहमदनगर : अवैध दारु धंद्याची माहिती पोलिसांना दिल्याच्या संशय घेवून झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देणा-या बाळासाहेब गायकवाड व त्याच्या नातेवाईकांवर कारवाई होण्याची मागणी शिवाजी गायकवाड यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.चोराच्या उलट्या बोंबा याप्रमाणे बाळासाहेब गायकवाड दहशतीने रक्कम वसुल करत असताना पोलिस प्रशासन त्याला पाठिशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला.

नेवासा तालुक्यातील चांदा येथे 04 जुलै रोजी एलसीबीच्या पथकाने छापा टाकून अवैधरित्या विक्री केली जाणारी दमनची दारु जप्त केली होती.पोलिसांना या दारुच्या धंद्याची माहिती अशोक गायकवाड याने दिल्याचा संशय घेवून झालेल्या अडीच लाखाच्या नुकसानीच्या भरपाईपोटी बाळासाहेब गायकवाड याने त्यांना पैश्याची मागणी सुरु केली.दारुच्या अवैध धंद्या विरुध्द कुठल्याही प्रकारची तक्रार केली नसताना बाळासाहेब गायकवाड याने दहशती पोटी 1 लाख 75 हजार रुपये संजू भगत,कारभारी जावळे,अनिल आडसुळे यांच्या समक्ष घेतले.तरी तो अजून पैश्याची मागणी करत असल्याने स्थानिक पोलिस प्रशासन त्याच्यावर कारवाई करण्यासाठी दखल घेत नसल्याचे शिवाजी गायकवाड यांनी स्पष्ट केले. 

बाळासाहेब गायकवाड यांच्या सांगण्यावरुन त्याचा भाचा अशोक जाधव (राहाणार आव्हाणे,तलुका शेवगावन) काही मुलांना आनून बंदुकीचा धाक दाखवुन जीवे मारण्याची धमकी देत आहे. त्याच बरोबर त्याचा सख्खा भाऊ भाऊसाहेब गायकवाड, अण्णासाहेब जाधव, रायभान गायकवाड, शिवाजी जाधव हे वारंवार दहशत पसरवुन मला व माझ्या कुटुंबीयांना मारण्याची धमकी देत आहे. याबाबत सोनई पोलिस स्टेशनला तक्रार केली असता पोलिसां समोर जीवे मारण्याची धमकी मिळत असताना सदर व्यक्तीं व त्याच्या नातेवाईकांकडून मला व माझ्या कुटुंबीयांना धोका असून काही बरे वाईट झाल्यास याची जबाबदारी संबंधीतांवर राहणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.तरी तातडीने सदर प्रकरणाची चौकशी करुन गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई व्हावी. तसेच कुटुंबीयांना सरंक्षण देण्याची मागणी शिवाजी गायकवाड यांनी केली आहे.